लसीकरण केंद्राच्या नावे फसवणूक
नाशिकः वेबपेज तयार करून त्यावर सावित्रीबाई फुले प्राथमिक आरोग्य केंद्र सिन्नरफाटा येथे कोवीड लसीकरण उपलब्ध असल्याची माहिती प्रसारीत केल्या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी डॉ. जितेंद्र श्रीपादराव धनेश्वर (लॅमरोड, नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीने सोमवारी (दि.१०) गुगलवर हे वेबपेज तयार करून लसीकरणाची खोटी माहिती प्रसारीत करून जनेतची दिशाभूल केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक बोरसे करत आहेत.
…..