नाशिक – हॉटेलमध्ये झोमॅटोची ऑनलाईन फुड डिलिव्हरी सुरू करून देण्याचा बहाणा करत भामट्याने हॉटेल चालकास सव्वादोन लाख रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १४ मार्चला घडला आहे. याप्रकरणी मोहन विष्णु मते (रा. मते वस्ती, आडगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मते यांचा हॉटले व्यवसाय असून ऑनलाईन फुड डिलीव्हरी सुरू करण्यासाठी त्यांनी गुगलवर माहिती शोधून एका क्रमांकावर संपर्क साधला होता. यावेळी भामट्याने त्यांना जाळ्यात अडकवत झोमॅटो रेस्टॉरंट व एमएमएस फॉरवर्डींग हे दोन ऍप डाऊनलोड करण्यास सांगीतले. त्याच्या सुचनेनुसार मते करत गेले. दरम्यान त्याने मते यांच्याकडून बँक अकौंटची माहिती घेत गुगल पेच्या माध्यमातून ऑनलाईन २ लाख ३९ हजार ९७ रूपये रक्कम काढून घेत गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास विरिष्ठ पोलीस निरिक्षक परोपकारी करत आहेत.