नाशिक : मोबाईल नंबरच्या आधारे रात्री बेरात्री अश्लिल चॅटींग करून महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अनोळखी मोबाईलधारका विरूध्द मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंदनगर भागात राहणा-या महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ७४४७८९६२१६ या मोबाईलवरून अनोळखी पुरूषाने महिलेशी ओळख वाढविण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी हाय.. हॅलो केल्याने महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर संशयीत नंबर धारकाने महिलेस फ्रेंडशिप करण्याबाबत विचारणा केली. यानंतर संशयीताने अविरत पाठलाग करीत महिलेस रात्री बेरात्री अश्लिल चॅटींग करून महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. हा प्रकार गेल्या रविवार (दि.१०) पासून रोज रात्री होवू लागल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी सदर मोबाईल नंबर धारकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार आनंदा शिंदे करीत आहेत.