लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार; उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विवाहास नकार दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी खेडलेझुंगे ता. निफाड येथील बापलेकाविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात बलात्कार आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक पाटील व सुदाम पाटील (रा.खेडलेझुंगे ता. निफाड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. दिपक पाटील या युवकाची तरूणीशी ओळख झाली होती. तरूणाने लग्नाचे आमिष दाखविल्याने दोघांमध्ये प्रेमसंबध निर्माण झाले. यातून ही घटना घडली. भीमवाडीतील एका सोसायटीत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार करण्यात आला. हा प्रकार सन. २०१८ पासून सुरू होता. युवतीने लग्नाचा तगादा लावल्याने संशयीत टाळाटाळ करू लागला. दोघा बापलेकांशी तरूणीने संपर्क साधला असता त्यांनी खालच्या जातीची असल्याने लग्नाल नकार देत जाती वाचक शिवीगाळ केली. यावेळी मुलाच्या वडिलांनी माझ्या मुलाचा नाद सोड नाही तर घरी येवून संपवून टाकेन अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी बलात्कार,अनैसर्गीक कृत्य आणि अनुसूचित जाती जमाती अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक आयुक्त सिध्देश्वर धुमाळ करीत आहेत.
शिखरेवाडी भागात झालेल्या घरफोडीत ८३ हजाराच्या ऐवजावर डल्ला
नाशिक : नाशिकरोड येथील शिखरेवाडी भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यानी सुमारे ८३ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोने चांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनिषा प्रेमानंद निघोजकर (रा.न्यु शिखर अपा.शिखरेवाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. निघोजकर कुटूंबिय २९ सप्टेंबर रोजी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधी कडप्याच्या मांडणीत ठेवलेले सुमारे ८० हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खडके करीत आहेत.