नाशिक : शहरात वाहनचोरीची मालिका सुरूच असून मालट्रकसह वेगवेगळय़ा भागात पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी इंदिरानगर व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज सारथी सोसायटी भागात राहणारे गणेश भानूदास शिंदे (रा. लक्ष्मी आर्के ड) यांचा पंधरा लाख रूपये किमतीचा मालट्रक एमएच १५ एफव्ही ३०३३ दि.२८ सप्टेंबर रोजी रात्री परिसरातील वॅस्क वॅन व्हिस्टा सोसायटी समोरील रस्त्याच्या कडेला पार्क केलेला असतांना चोरट्यांनी नेला. दुसरी घटना पाथर्डी फाटा भागात घडली. विक्रीकर भवन भागात राहणारे रंगनाथ बाळू बºहे (रा.सुशिल अपा.आनंदनगर) यांची पॅशन प्रो (एमएच १५ सीवाय ४५७५) दुचाकी बुधवारी (दि.१३) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली. दोन्ही घटनांप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे व हवालदार पथवे करीत आहेत. तर अनिल रामदास डामसे (रा.आंबेबहुला पो.विल्होळी) यांची मोटारसायकल एमएच १५ एचके ४२९५ मंगळवारी (दि.१२) रात्री औद्योगीक वसाहतीतील विवेक प्लास्टीक प्रा.लि. या कारखान्याच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत