नाशिक – शहर पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून रात्री गस्तीदरम्यान घरफोडीच्या तयारीतील तिघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या. सागर विलास कोरडे (एरंडवाडी पंचवटी), राजूरंगास्वामी भुजा (वय २२, भगवली मिल, खालेगाव सिन्नरएमआयडीसी, नागेश विरेंद्र चव्हाण (वय २१, लोनकर मळा,जयभवानी रोड नाशिक रोड) अशी संशयितांची नावे आहेत. काल शनिवारी (ता.९) नाशिक रोड पोलिस रात्री गस्त घालत असतांना रिर्पोटे कॉर्नर परिसरात रात्रीच्या सुमारास अंधारात संशयास्पदरित्या फिरत असल्याचे आढळून आले. पोलीस शिपाई कैलास अशोक झाडे यांच्या तक्रारीवरुन नाशिक रोड पोलिस ठाण्यात दोघाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तरसागर कोरडे हा पंचवटीतील रामवाडी परिसरात श्रध्दा पार्क परिसरात एरंडवाडी भागात रात्री घरफोडीच्या तयारीत आढळून आला. पोलिस शिपाई अंबादास केदार यांच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.