नाशिक – सातपूरला चोरट्यांनी छताचे पत्र उचकटून इलेक्ट्रॉनीक कंपनीतील दीड लाखांचा ऐवज चोरु नेला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजेंश वसंतराव बुऱ्हाडे (वय ४८,ओंकारेश्वर, पुष्पकनगर टाकळी रोड) यांच्या तक्रारीनुसार, गुरुवारी
७ ऑक्टोबरला सातपूरला औद्योगिक वसाहतीतील एफ २२ प्लॉटमधील जैविक इलेक्ट्रॉनीक्स या कारखान्याच्या छताचे पत्र्याची काच फोडून कंपनीत प्रवेश करीत कंपनीतील वेगवेगळ्या विभागातील जाऊन तेथील तांब्याच्या तारांचा ऐवज चोरुन नेला. उचकटून चोरट्यांनी ईटीपी कॉपरचे रॉड, १० किलो फ्लेक्झिबल कॉपर वायर, तसेच वीसकिलो वजनाची तांब्याती तार, १६ किलो वजनाची ०.८ इंची ताब्याची तार, असा सुमारे वेगवेगळ्या प्रकारातील दीड लाखांच्या तांब्याच्या वापय शोल्डरिंग ट्रॉन्सफार्मर असा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. सातपूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोरे तपास करीत आहे.