नाशिक – अशोका मार्गावर एकाने अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्यावरुन एकावर गुन्हा दाखल झाला आहे. दानिश आक्रम खान (वय २९, रेहमतनगर, वडाळागाव,इंदिरानगर) असे संशयिताचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन त्याच्या विरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी (ता.९) सकाळी साडे आठच्या सुमारास संशयिताने अल्पवयीन पीडित मुलगी शाळेत गेली असता तुझ्या पप्पांनी बोलावले आहे. मी तुला घ्यायला आलो आहे. असे सांगून तिला पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीत बसून अज्ञात लॉजवर नेले तेथे एका रुममध्ये नेऊन तिच्याशी बळजवरीने तिच्याशी लगट करीत तिच्यासोबत अश्लील स्थितीत मोबाईल सेल्फी घेतले. तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरुन दानीश खान याच्या विरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.