सोसायटीच्या पार्किंगमधून सायकलींची चोरी
नाशिक : सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या चार सायकली चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तिडके कॉलनीत घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय मुलचंद पिचा (रा.लंबोधर अव्हेन्यू,पुष्पांजलीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. लंबोधर अव्हेन्यू या सोसायटीतील सदस्यांच्या सायकली गेल्या शुक्रवारी (दि.७) सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या असतांना त्यातील सुमारे ५५ हजार रूपये किमतीच्या चार सायकली चोरट्यांनी चोरून नेल्या.अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.
….