नांदगाव – धनेर फाटा भागात मोराची शिकार केल्या प्रकरणी मालेगावचे मुद्दस्सिर अहमद अकील अहमद आणि जाहीद अख्तर साईद अहमद या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी वन्यजीव संरक्षक व आर्म अॅक्ट कायद्यान्वये नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या संशयीतांना चौकशीसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी धनेर फाटा भागात धाव घेत स्थानिकांच्या मदतीने संशयीतांना ताब्यात घेतले. त्यानंतर या संशयीतांच्या ताब्यातून मृत अवस्थेतील एक मोर पक्षी, शिकारीसाठी वापरलेली हत्यारे, लाईटर, वीज टेस्टर, कटर, ऑईलची बाटली, एअर रायफल व गोळ्या, ११०० रुपयांची रोकड आणि दुचाकी घेतली आहे. या घटनेची वनपाल अशोक सोनवणे यांनी तक्रार दिली असून नांदगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवडकर यांनी ही कारवाई केली आहे.