नाशिक – पॅरोलवर सुटलेल्या एका गुन्हेगाराने ब्युटी पार्लरमध्ये चाकूचा धाक दाखवून एका २७ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सिडको परिसरात घडली आहे. या पीडित महिलेने घटनेची माहिती दिल्यानंतर याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहे. खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या पण, सध्या पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराने हे कृत्य केले आहे. त्याने पॅरोल काळात हा बलात्कार केल्यामुळे या सुटवरही आता प्रश्न उपस्थिती केले जात आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली आहे. राज्यात बलात्काराच्या घटनेत वाढ होत असतांना नाशिकमध्ये पॅरोलवर सुटलेल्या कैद्याने केलेला हा बलात्कार धक्कादायक आहे.