एकलहरे रोडला दुचाकी पेटविली
नाशिक – नाशिक रोडला शनिवारी (ता.२५) मध्यरात्री ॲक्टीव्हा दुचाकी पेटविल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मारुती नरसिंग शिंदे (वय २१, कृष्णनगर अरिंगळे मळा,) यांच्या तक्रारीवरुन नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी शनिवारी मध्यरात्री मारुती नरसिंग शिंदे यांची ॲक्टीव्हा (एमएच १५ ईएन ३०२८) ही दुचाकी सफेद निळ्या रंगाच्या डिओ गाडीवरुन आलेल्या तिघा अज्ञात समाजकंटकांनी ज्वलनशील पदार्त टाकून पेटवूनदिली नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.डी. परदेशी तपास करीत आहेत.
हुंड्यासाठी सासरच्याकडून छळाची तक्रार
नाशिक – घर बांधण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणावेत यासाठी नउ वर्षापासून सासरच्या मंडळीकडून
छळ होत असल्याच्या पिडीतेच्या तक्रारीवरुन दोघा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. केशव प्रभाकर चव्हाण
व पारुबाई चव्हाण (नैताळे, ता निफाड) अशी संशयितांची नावे आहे. पिडीतेच्या तक्रारीनुसार, २६ जून २०१२ पासून
तर ऑक्टोबर २०२० पर्यत वेळोवेळी संशयितांनी पिडीतेला माहेरुन घर बांधण्यासाठी १ लाख रुपये आणावेत यासाठी
छळ केला तसेच गोड बोलून तिच्या गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी, झुमके असा सुमारे पाच तोळ्याचे सोन्याचे
दागिणे आणि १ लाखांची हंड्यांची रक्कमेची विल्हेवाट लावली.