महिलेचा ई मेल हॅक; सायबर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
नाशिक – उपनगरला मातोश्रीनगर परिसरातील महिलेचा ई मेल हॅक करुन परस्पर त्यातील मेल डिलीट केल्याप्रकरणी
गुन्हा दाखल झाला आहे. प्रियंका एकनाथ लखोटे (वय ३०, मातोश्रीनगर उपनगर) यांच्या तक्रारीवरुन निवी जलान
यांच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी शुक्रवारी(ता.२४) सप्टेंबरला दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास प्रियंका लखोटे यांचा हॉट मेल खात्यातील मेल आयडी त्यांच्या परवानगीशिवाय हॅक करण्यात येउन त्यातील मेल डिलीट केल्याचे तसेच त्यांचा ॲक्सेस काढल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात मेल आयडी हॅक झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण तपास करीत आहेत.
बसच्या धडकेत युवती जखमी
नाशिक – जुन्या सीबीएस सिग्नल परिसरात खासगी बसच्या धडकेत युवती जखमी झाली. प्रिया सिंग (वय
२२, सिडको ) असे जखमी युवतीचे नाव आहे. याप्रकरणी दीपक संतोष सुर्यवंशी (वय २४, डिफेन्स कॉलनी,
अंबरनाथ ठाणे) यांच्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली
माहीती अशी गुरुवारी (ता.२३) दीपक व प्रिया सिंग त्यांच्या दुचाकीवरुन (एमएच १५ एचए १८३६)
हिच्यावरुन कृष्णा हॉस्पीटलकडे जात असतांना सातपूरकडून त्र्यंबक रोड सिग्नलकडे येणाऱ्या खासगी बस (एमएच १४ सीडब्लू ३४१२) हिच्या धडकेमुळे प्रिया जखमी झाली.