दोघांना अटक
नाशिक – नाशिक सहकारी साखर कारखाना परिसरातील गोडाऊन फोडून सुमारे लाखांचा ऐवज लांबविल्याप्रकरणी
दोघांना अटक करण्यात आली आहे. सोनू उर्फ अनिल माणिक शिंदे,(वय १९, आढाव पंपाशेजारी,रोशन उर्फ आनंदा
गायकवाड (वय २०, साईनाथनगर नांदूरनाका) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली
माहीती अशी गुरुवारी (ता.२३) मध्यरात्रीतून संशयितांनी योगेश नागरे शिवाजीनगर जेल रोड पळसे कारखाना
परिसरातील गोडाऊनचा दरवाजा वाकवून त्यातील ७० हजाराचा केएसबी कंपनीचा ४१ एचपी सबमर्सिब पंप, एक पाच एचपीचा पंप आणि मोटार असा सुमारे लाखांचा ऐवज लांबविला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून हवालदार आर. ए साबळे तपास करीत आहेत.
बेलतगव्हाण येथे नदीपात्रात मृतदेह
नाशिक – लॅम रोड भागातील बेलतगव्हाण गावात नदीपात्रात गावातील एकाचा मृतदेह तरंगतांना आढळून
आला. तुकाराम राजाराम गाढवे (वय ४५, ) असे मृताचे नाव आहे. शनिवारी (ता.२५) साडे सहाच्या सुमारास
नदीपात्रात मृतदेह तरंगताना आढळून आला. मृत तुकाराम गाढवे २३ सप्टेंबरपासून घरात कुणालाही काही न सांगता
निघून गेले होते. दोन दिवसांनंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. मोनीश दोंदे यांच्या माहीतीवरुन नाशिक रोड पोलिस
ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.