नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणा-या तडीपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई औद्योगीक वसाहतीतील स्वामीनगर भागात करण्यात आली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण आण्णा कडुस्कर (२० रा.आनंद सागर अपा.अंबड) असे अटक केलेल्या तडीपाराचे नाव आहे. करण कडुस्कर याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे शहर पोलीसांनी त्यास दोन वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. सोमवारी (दि.२०) रात्री तो स्वामी नगर येथील महादेव मंदिर भागात असल्याच्या माहितीवरून पोलीसांनी सापळा लावून त्यास जेरबंद केले. याप्रकरणी पोलीस शिपाई राकेश राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक गवळी करीत आहेत.