अमरधाम रोड भागात चाकूचा धाक दाखवून दोघा मित्रांना लुटले
नाशिक : चाकूचा धाक दाखवून दोघा मित्रांना लुटल्याची घटना अमरधाम रोड भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी दोघा संशयीतांना जेरबंद केले आहे. त्यातील एक सराईत गुन्हेगार आहे. सुरज जगन (२४ रा.गंगोधरी बिल्डीग, जेहान सर्कल) व शिवाजी गांगुर्डे (२८ रा.निर्मला कॉन्व्हेंट जवळ,दादोजी कोंडदेव नगर) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहे. सुरज जगन हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून गंगापूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरूध्द अनेक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी कौतिक शरद पवार (१८ रा.गणेशवाडी) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. कौतीक पवार व आकाश भाग्यवंत हे दोघे मित्र बुधवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास इंद्रायनी ट्रव्हल्स पार्किंग समोर गप्पा मारत असतांना ही घटना घडली. एमएच १५ सीबी ९९९६ या दुचाकीवर आलेल्या दोघा संशयीतांनी गप्पा मारणा-या मित्रांना गाठून लुटमार केली. संशयीत सुरज जगन याने कौतीक पवार यांच्या मानेस चाकू लावून दमदाटी करीत जिवे मारण्याची धमकी देत दोघांच्या खिशातील पैसे आणि मोबाईलची मागणी केली. यानंतर भामट्यांनी दोघा मित्रांची अंगझडती घेत पवार यांच्या खिशातील दोनशे रूपये बळजबरीने काढून पोबारा केला होता. दुचाकी नंबरच्या आधारे पोलीसांनी त्यांना हुडकून काढले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
पार्क केलेली दुचाकी जुन्या वादातून एकाने पेटवली
नाशिक : घरासमोर पार्क केलेली दुचाकी जुन्या वादातून एकाने पेटवून दिल्याचा प्रकार गोरेवाडीत घडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक मेहरोलिया (रा.डायमंड रो हाऊस गोरेवाडी) असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी संतोष शंकर जाधव (रा.ओमसाई शांतीनगर,गोरेवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. संतोष जाधव यांनीची एमएच १५ एफएक्स ७८५४ मंगळवारी (दि.१४) रात्री त्यांच्या घराच्या पाठीमागे पार्क केलेली असतांना अज्ञात समाजकंटकाने ती पेटवून दिली. या घटनेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, नजीक राहणारे मेहरोलिया यांनी जुन्या वादाच्या रागातून ज्वलनशील पदार्थ टाकून दुचाकी पेटविल्या आरोप जाधव यांनी केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.
….