नाशिक : आजारी पतीसमवेत रूग्णालयात थांबलेल्या महिलेचा सफाई कामगाराने विनयभंग केल्याची घटना गंगापूररोडवरील एका नामांकित हॉस्पिटल मध्ये घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतास पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रकाश रविंद्र टोंगारे (२७ रा.आनंदवली) असे अटक केलेल्या संशयीत कामगाराचे नाव आहे. टोंगारे हा गंगापूररोडवरील श्री गुरूजी हॉस्पिटल मधील कंत्राटी कामगार आहे. पीडित महिलेच्या पतीवर याच रूग्णालयात उपचार सुरू असून, बुधवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रूग्णाच्या शेजारील कॉटवर महिला आराम करीत असतांना साफसफाईच्या निमीत्ताने कक्षात शिरलेल्या संशयीताने तिचा विनयभंग केला. पीडितेच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयीतास अटक केली आहे. अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.