जिन्यावरून पडल्याने ७७ वर्षीय वृध्दाचा मृत्यु
नाशिक : राहत्या घरातील जिन्यावरून पडल्याने ७७ वर्षीय वृध्दाचा मृत्यु झाल्याची घटना जयभवानीरोड भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. कारभारी विश्वनाथ गंगावणे (रा.लवटेनगर) असे मृत वृध्दाचे नाव आहे. गंगावणे रविवारी (दि.१२) रात्री आपल्या घरातील जिन्यावरून खाली उतरत असतांना अचानक पाय घसरल्याने ते पडले होते. या घटनेत दुखापत झाल्याने कुटूंबियांनी त्यांना तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार काझी करीत आहेत.
तरूणाने विषारी औषध सेवन करून केली आत्महत्या
नाशिक : संसारीगावातील ३६ वर्षीय तरूणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. विशाल प्रभाकर गाडेकर (रा.वैष्णवी छाया अपा.संसारीगाव) असे आत्महत्या करणा-या तरूणाचे नाव आहे. गाडेकर यांनी रविवारी (दि. १२) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार पानसरे करीत आहेत.
…