अंबड औद्योगीक वसाहतीत सुरा घेवून दहशत निर्माण करणा-या तरूणास पोलीसांनी केले गजाआड
नाशिक : अंबड औद्योगीक वसाहतीत सुरा घेवून दहशत निर्माण करणा-या तरूणास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीत धारदार सु-याचा धाक दाखवून नागरीकांमध्ये दहशत निर्माण करीत होता. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिध्दांत मसाजी धनले (२२ रा.घरकुल योजना,अंबड) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. धनले हा रविवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारा घरकुल योजने कडे जाणा-या मार्गावरील हॉटेल शिवकृपा समोर दहशत माजवित होता. याबाबत माहिती मिळताच अंबड पोलीसांनी धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. संशयीताच्या अंगझडतीत धारदार सुरा मिळून आला असून तो दहशत प्रस्तापित करण्यासाठी नागरीकांना शिवीगाळ करीत होता. याप्रकरणी पोलीस शिपाई मुकेश गांगुर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.
वृध्दाने गळफास लावून केली आत्महत्या
नाशिक : जेलरोड भागातील ७० वर्षीय वृध्दाने गळफास लावून घेतल्याची घटना रविवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. वृध्दाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. वसंत पुनाजी कुमावत (रा.पंगती अपा.गुरू अमृतनगर पवारवाडी) असे आत्महत्या करणा-या वृध्दाचे नाव आहे. कुमावत यांनी रविवारी (दि.१२) आपल्या राहत्या घरातील रूममध्ये दरवाजा लावून घेत पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब सायंकाळच्या सुमारास निदर्शनास आली. या घटनेत त्यांचा मृत्यु झाला. मुलगा अमोल कुमावत यांनी दिलेल्या खबरी वरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार गिते करीत आहेत.
….