दारु न पाजल्याने डोक्यात मारला दगड ; गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक – सिध्दार्थनगर परिसरात दारु न पाजल्याने एकाच्या डोक्यात दगड मारुन त्याला जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आला. भारत भास्कर गायकवाड (सिध्दार्थनगर, बॉईज टाउन जवळ) यांच्या तक्रारीवरुन दिलीप विष्णु गायकवाड या संशयिता विरोधात मारमारीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी शुक्रवारी (ता.१०) सायंकाळी सहाच्या सुमारास दिलीप विष्णु गायकवाड हा भारत गायकवाड यांच्याकडे आला व मला दारु पाज नाही तर, दारु पिण्यासाठी पैसे दे असे म्हणत पैशाचा आग्रह धरला. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने संशयिताने दगड उचलून त्याच्या डोक्यात मारला. तसेच त्याच्या दुचाकीचे नुकसान केले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडकोत दुचाकीच्या धडकेत एक जखमी
नाशिक – सिडकोत सावरकर नगर परिसरात दुचाकीच्या धडकेत दुसरा दुचाकीस्वार जखमी झाला. सुरेश शंकरराव भडके (वय ५३, वीर सावरकर नगर सिडको) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी जयश्री भडके यांच्या तक्रारीनुसार, गुरुवारी (ता.९) पहाटे साडे तीनच्या सुमारास अंबड पाथर्डी मार्गावरुन त्यांचे पती सुरेश शंकरराव भडके हे त्यांच्या दुचाकी (एमएच १५ एफपी १८९) हिच्यावरुन जात असतांना मंजुळा किराणा दुकानासमोरुन आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत होउन जखमी झाले. अपघाताची माहीती न देताच संशयित दुचाकीस्वार फरार झाला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे