नाशिक – हाणाामा-यासह विविध गंभीर गुन्हे असलेल्या सराईताने दोघा पोलीसांना धक्काबुक्की करीत शासकिय कामात अडथळा आणल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयीतास पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण गणपत काकड (वय २८, गुलमोहरनगर, गजपंथ समोर म्हसरुळ ) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. याप्रकरणी म्हसरूळचे पोलीस शिपाई नितीन पारधे यांनी तक्रार दाखल केली आहे. म्हसरुळ स्मशानभूमी भागात गुरुवारी (दि. ९) रात्री संशयीत संशयास्पद आढळून आला. गस्तीवरील पोलिस शिपाई पारधे व योगेश पवार यांनी त्याची चौकशी केली असता ही घटना घडली. येथे का बसला असा जाब विचारल्याने संशयीताने तू कोण आहेस, मला ओळखत नाही का, आताच मी जेल मधून सुटून आलो आहे असे म्हणत त्याने पारधे यांची कॉलर पकडून तुझी नोकरी घालवितो असे म्हणत शिवीगाळ करीत धक्काबुकी केली. यावेळी पवार आपल्या सहकारीच्या मदतीस धावून गेले असता संशयिताने त्यांनाही धक्काबुक्की करून जमिनीवर पाडले. संशयीत प्रवीण काकड याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असून पोलीसांवर आता गुन्हेगार हात उचलू लागल्याने पोलासांचा दरारा कमी झाल्याचा प्रत्यय येत आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.