नाशिक – जुना आडगाव नाका परिसरात एका अनोळखी इसमाची शुक्रवारी रात्री हत्या झाल्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. जवळपास १ कि.मी अंतर त्याचा पाठलाग करुन त्याची धारधार हत्याराने गळा चिरुन हत्या केल्याचे बोलले जात आहे. रामरतन लॅाज येथील बंद गाळ्यासमोर हा अनोळखी इसम जखमी अवस्थेत होता. ही घटना समजताच पोलिस घटनास्थळी गेले. त्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, येथे त्याचा मृत्य़ू झाला. या युवकाच्या हत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. पंचवटी पोलिस पुढील तपास करीत आहे.