ं
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या तरूणास गाठून चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करीत त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना शेरेमळा भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश पवार,कृष्णा पाटील,प्रणव देव्हारे आणि गिरीश शिंपी अशी तरूणावर हल्ला करणा-या संशयीताचे नाव आहे. या हल्यात सुरज चंद्रभान गायकवाड (२२ रा.कोळीवाडा,गणेशवाडी) हा युवक जखमी झाला आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ आकाश गायकवाड याने तक्रार दाखल केली आहे. सुरज गायकवाड मंगळवारी (दि.७) रात्री शेरे मळयातील शिवाजी हॉल भागातून पायी जात असतांना त्यास संशयीतांनी गाठले. यावेळी कुठलेही कारण नसतांना त्यास शिवीगाळ करीत टोळक्याने लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच एकाने चाकू सारख्या धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केल्याने सुरज जखमी झाला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक केदार करीत आहेत.