नाशिक : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत घरात घुसलेल्या चोरट्यांनी कपाटातील ६५ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंदा भिका जाधव (६२ रा.कृष्णमंदिराजवळ,शिवाजीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जाधव कुटुंबिय २७ ऑगष्ट रोजी आपआपल्या कामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी दरवाजा उघडा असल्याची संधी साधत घरात प्रवेश केला. व कपाटात ठेवलेले ६५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.