नाशिक : बसस्थानकात मुक्कामी थांबलेल्या एसटीतील डिझेल चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार महामार्ग बसस्थानकात घडला. सुमारे दहा हजार रूपयांच्या डिझेलवर चोरट्यांनी डल्ला मारला असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र बांगर (रा.पाटोदा,बिड) या बसचालकाने तक्रार दाखल केली आहे. बांगर बिड आगारात चालक म्हणून कार्यरत असून मंगळवारी (दि.७) ते बिड नाशिक ही मुक्कामी एमएच २० बीएल १३२७ बस पाटोदा मार्गे घेवून शहरात दाखल आले होते. सायंकाळी महामार्ग बसस्थानक आवारातील पार्सल पॉईंट जवळ बस पार्क करून ते वाहकास सोबत घेवून जेवणासाठी गेले असता ही घटना घडली. रात्री अज्ञात चोरट्यांनी उभ्या बसमधील सुमारे ९ हजार ६०० रूपये किमतीचे १०० लिटर डिझेल काढून घेतले. ही बाब दुस-या दिवशी सकाळी उघडकीस आली. प्रवाशी भरण्यासाठी प्लॅटफार्मवर ते बस लावत असतांना ही घटना निदर्शनास आली. अधिक तपास हवालदार आडके करीत आहेत.