नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागातून पुाहा तीन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. वाहनचोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होवू लागली असून, याप्रकरणी भद्रकाली,उपनगर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. उंटवाडीतील राजेंद्र बाबुराव देसाई (रा.कालीकानगर) गेल्या रविवारी (दि.५) द्वारका भागात गेले होते. पौर्णिमा बस थांबा भागातील गणपती स्टॉल समोर त्यांनी आपली अॅक्सेस एमएच १५ एचएल १४७८ ही दुचाकी पार्क केली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक सोनवणे करीत आहेत. दुसरी घटना नाशिकरोड येथील अंधशाळा भागात घडली. हेमंत प्रविण उबाळे (रा.प्राईड ग्लोरी,बिगबाजार मागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. उबाळे यांची एमएच १५ सीयू ७०३५ ही मोटारसायकल गेल्या ३१ ऑगष्ट रोजी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार काझी करीत आहेत. तर शांताराम बंडू उगले (रा.विहीतगाव) हे बुधवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास नाशिकरोड येथे आले होते. अनुराधा थेअटर जवळील नवीन कोविड सेंटर मागे त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच १५ बीपी ३४५८ पार्क केली असता चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.
…..