रिक्षा प्रवासात महिलेचे सहप्रवासी महिलेनेच लंपास केले ४७ हजाराचे दागिने
नाशिक : रिक्षाप्रवासात पर्स मध्ये ठेवलेले महिलेचे दागिणे सहप्रवासी असलेल्या भामट्या महिलांनी हातोहात लांबविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजली गणेश कुलकर्णी (रा.डीजीपीनगर,सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुलकर्णी या ३० ऑगष्ट रोजी बाहेरगावी जाण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात आल्या होत्या. खुटवडनगर येथील माऊली लॉन्स येथून त्या रिक्षातून प्रवास करीत असतांना सहप्रवासी असलेल्या दोन महिलांपैकी कुणी तरी त्यांच्या पिशवीत ठेवलेल्या पर्सची चैन उघडून सुमारे ४७ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास हवालदार धारणकर करीत आहेत.
खब-या असल्याच्या संशयातून एकास मारहाण
नाशिक : पोलीसांना माहिती देतो या संशयातून टोळक्याने एकास लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्याची घटना आनंदवली येथे घडली. या घटनेत तरूण जखमी झाला असून या टोळक्यात एका सराईताचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय शिवाजी मिसाळ (३० रा.मारूती मंदिराजवळ,बजरंगनगर), सोनू भालेराव,सनी कांबळे,संदिप मोढे असे तरूणास मारहाण करणा-या संशयीताची नावे असून मिसाळ हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याप्रकरणी अक्षय गुलाब पगारे (२६) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. पगारे सोमवारी (दि.६) रात्री मारूती मंदिर परिसरात आपल्या मित्रांशी गप्पा मारत असतांना ही घटना घडली. यावेळी टोळक्याने मिसाळ यास गाठले व तू आमची माहिती पोलीसांना देतो या कारणातून वाद घालत त्यास लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. याघटनेत मिसाळ जखमी झाला असून, अधिक तपास हवालदार खुळात करीत आहेत.