नाशिक : परिचीतांनी लुटल्याने एका तरूणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार गंगापूररोड भागात घडला. विषारी औषध सेवन केलेला तरूण अत्यावस्थ अवस्थेत मिळून आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सदर तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत प्रविण निकाळे (२१ रा.हिरावाडीरोड,पंचवटी) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. अनिकेत रविवारी (दि.५) सायंकाळच्या सुमारास गंगापूररोडवरील रावसाहेब सभागृह भागात अस्वस्थ अवस्थेत मिळून आला होता. विषारी औषध सेवन केलेले असल्याने सरकारवाडा पोलीसांनी त्यास रूग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अनिकेत निकाळे याने दिलेल्या जबाबानुसार केवडी बनातून तपोवन मार्गे जात असतांना किरण शेळके,सोनू व नागेश शर्मा यांनी त्याची वाट आडवून लुटले होते. जुन्या वादाची कुरापत काढून संशयीतांनी त्याच्या खिशातील ९ हजार रूपयांची रोकड बळजबरी काढून घेतली होती. या नैराश्यातून त्याने ढेकून मारण्याचे औषध सेवन केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान संशयीतांविरोधात त्याने पोलीसात तक्रार देणे गरजेचे असतांना स्व:ता आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी नाजिम शेख यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोरडे करीत आहेत.