रिक्षाप्रवासात महिलेचे दागिणे लंपास
नाशिक – दत्तमंदीर ते संभाजी चौक दरम्यान प्रवास करतांना महिलेच्या पर्समधील चोवीस हजाराचे दागिणे चोरट्यांनी लांबविले. याप्रकरणी प्राजक्ता वैभव सोनजे (वय ३६, आर्यवर्त महाराण प्रताप चौक) यांच्या तक्रारीवरुन मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी शनिवारी (ता.४) दुपारी सव्वाच्या सुमारास प्राजक्ता सोनजे या संभाजी चौक ते दत्तमंदीर स्टॉप दरम्यान रिक्षाने प्रवास करीत असतांना रिक्षातील अज्ञात दोघांनी त्यांच्या पर्समधील चार ग्रॅम सोन्याची अंगठी, दिड ग्रॅमचे सोन्याचे वेढे यासह रोकड असा सुमारे पंचवीस हजाराचा ऐवज चोरला.
चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
नाशिक – मुंबई आग्रा महामार्गावरील आडगाव चौफुलीवर गुरुवारी अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. हेमंत रामनाथ गडकरी (वय ५५, लेखानगर सिडको) असे जखमीचे नाव आहे त्यांच्या तक्रारीवरुन गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास ते त्यांच्या ड्रिम युगा (एमएच १५ डीक्यु ६७५१) दुचाकीवरुन आडगाव चौफुली रस्ता ओलांडत असतांना ओझर कडून भरधाव येणाऱ्या पांढऱ्या कार (एमएच ४१ एझेड ९७७९) हिने धडक दिल्याने ते जखमी झाले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
महिलेचे मंगळसूत्र ओरबडले
नाशिक – कॉलेज रोड वर पाटील लेन भागात शनिवारी सायंकाळी भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबडून नेली. साईमंदीर परिसरात हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शोभा कचरु इंगळे (वय ५७, सुशील अपार्टमेंट बिग बाजार जवळ) यांच्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, शनिवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास शोभा इंगळे साई मंदीरासमोरुन जात असतांना काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या टोपीच जॅकेट घातलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत ओरबडून नेली.
नाशिक रोडला महिलेची पोत ओरबडली
नाशिक – नाशिक रोडला अंधशाळा परिसरातील ग्रीन मेडो सोसायटी दुचाकीवरुन आलेल्या भामट्यांनी महिलेची सोन्याची पोत ओरबडून नेली. याप्रकरणी छाया शिवाजी जाधव (वय ५५,आर्टीलरी सेंटर रोड) यांच्या तक्रारीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी शनिवारी (ता.४) दहाच्या सुमारास छाया जाधव या बीग बाजार मागील ग्रीन मेडो सोसायटी समोरुन पायी चालल्या असतांना काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या भामट्यांनी त्यांच्या जवळ गाडी काहीशी हळू केली त्यापैकी पाठीमागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओबरडून नेली.