ऑनलाईन कर्जाच्या बहाण्याने सव्वा लाखाला गंडा
नाशिक – ऑनलाईन पर्सनल लोनसाठी अर्ज केलेल्या एकाला भामट्यांनी १ लाख ९ हजाराला गंडविले. मिलींद वसंत खरात (वय ३८, इगुनु वायसीएमओयु सेवा आर्टीलरी सेंटर रोड) यांच्या तक्रारीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी मिलींद खरात यांनी ९ जूनला पर्सनल लोनसाठी ॲनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर १२ जूनला त्यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे भासवून व्हॉटसअपवर बजाज फायनान्सचे बोगस ओळखपत्र पाठवून विश्वास संपादन करीत प्रोसेसिंग फीच्या बहाण्याने त्यांच्या बॅक खात्याची माहीती घेउन १ लाख ९ हजाराला गंडविले.
जुन्या भांडणातून एकाला मारहाण
नाशिक – दोन वर्षापुर्वी झालेल्या जुन्या भांडणातून बुधवारी सुयोजित गार्डन परिसरात एकाला बेदम मारहाण करीत वार करण्यात आले. रुद्रपताप ओंकार आहेर (वय २४, पिंपळगाव बसवंत) असे जखमीचे नाव आहे. त्याच्या तक्रारीवरुन मयुर गोरडे, नीलेश रकीबे यांच्या विरोधात म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी बुधवारी (ता.१) साडे अकराच्या सुमारास संशयितांनी दोन वर्षापूर्वी झालेल्या जून्या भांडणातून पिंपळगाव येथील रुद्रप्रताप आहेर याला फोन करुन नाशिकला सुयोजित गार्डन परिसरात बोलावून घेतले शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच एकाने पाठीमागून डोक्यात धारदार शस्त्राने वार केला.