चेहेडी पंपीग भागात सव्वा चार लाखांची घरफोडी
नाशिक – नाशिक रोडला चेहेडी पंपीग मार्गावरील मराठानगर परिसरात चोरट्यांनी घरफोडीत सुमारे सव्वा चार लाखांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. गुरुवारी (ता.२) ते शनिवारी (ता.४) दरम्यान कधी तरी ही घरफोडी झाली. याप्रकरणी उत्तम धोंडू सारुक्ते (वय ६७, मराठाकॉलनी) यांच्या तक्रारीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी २ सप्टेंबरला उत्तम सारुक्ते यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करीत घरातील बेडरुममधील लोखंडी कपाट उचकटून त्यातील लॉकर तोडून लॉकरमधील ६५ ग्रॅम सोन्याची पोत, २० ग्रॅमची सोन्याची चेन, ५ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन चेन, १० ग्रॅमची सोन्याची बोरमाळ, २५ ग्रॅमचे सोन्याचे नेकलेस, ४ ग्रॅमची सोन्याची नथ, १ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन नथ, २ ग्रॅमचे सोन्याचे वेल, ५ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, ५० हजाराची रोकड असा सुमारे ४ लाख २० हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. नाशिक रोड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.डी.परदेशी तपास करीत आहेत.
जाधव संकूल भागात चाळीस हजाराची घरफोडी
नाशिक – सातपूर अंबड लिंक रोडवरील जाधव संकूल भागात गुरुवारी घरफोडीत चाळीस हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी सतीश सुरेश गडाख (वय २८, कल्पतरु रो हाउस जाधव संकूल) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी गुरुवारी (ता.२) मध्यरात्री दरवाजा उघडा ठेउन झोपल्याची संधी साधून २० हजाराचा लिनिव्हो आयडीया पॅड, रेडमी नोट ९ प्रो मोबाईल, रोड मी नोट ९ मोबाईल, यासह सुमारे चाळीस हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल लॅपटॉप चोरुन नेला. अंबड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.