नाशिकमध्ये गुजरात पोलिसांची मोठी कारवाई; आसाराम बापू आश्रमाच्या संचालकाला केली अटक
नाशिक : १२ वर्षापासून फरार असलेल्या आसाराम बापू आश्रमाच्या एका संचालकाला गुजरात पोलिसांनी नाशिकममधून अटक केली आहे. संजय किशनकिशोर वैद असे या संचालकांचे नाव आहे. काल वैद गायीचे खाद्य घेण्यासाठी पंचवटी येथे गेले होते. येथे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पण, रात्री त्याचे अपहरण करण्यात आल्याच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पण, त्यानंतर त्याला गुजरात पोलिसांनी अटक केल्याचे समोर आले आहे. याबाबत गुजरात पोलिसांनी स्थानिक पोलिसांना कोणतीच माहिती न दिल्यामुळे हा गोंधळ झाला. वैद्य यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा गुजरातमध्ये दाखल आहे. पण, वैद १२ वर्षापासून फरार होते. त्यामुळे त्यांना ही अटक करण्यात आली. पण, रात्री याबाबत अपहरण झाल्याची तक्रार आसाराम बापू आश्रमाचे राजेश चंद्रकुमार डावर (रा.सावरकरनगर) यांनी तक्रार दाखल केली. त्यात सावरकरनगर येथील आश्रमाचे संचालक संजीव वैद्य हे गुरूवारी (दि.२) दुपारच्या सुमारास पंचवटीतील सेवाकुंज भागात गेले असता ही घटना घडल्याचे म्हटले आहे. आश्रमातील गाईंना पशू खाद्य खरेदी करण्या करीत वैद्य आश्रमातील पिकअप एमएच ४८ टी ३०९६ घेवून गेले होते. सेवाकुंज येथील नागसेठीया पशू खाद्य दुकानात ते खरेदी करीत असतांना इनोव्हा कारमधून आलेल्या अनोळखी चार इसमांनी त्यांना गाठून दमदाटी करीत आपल्या वाहनात बसवून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले होते. पण, त्यानंतर गुजरात पोलिसांनी त्याला अटक केल्याचे समोर आले आहे.
पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
डॉ.सीताराम कोल्हे यांनी दिली सविस्तर माहिती
पंचवटी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक २८१ /२०२१ कलम ३६५, ३४ भा.द.वि या गुन्ह्यातील किडनॅप इसम नामे संजीव वैद्य,वय ४४ राहणार आसाराम बापू आश्रम गंगापूर रोड नाशिक हे २ सप्टेंबर २०२१ रोजी ३ वाजता पशुखाद्य घेण्यासाठी पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत आले असता चार अनोळखी लोकांनी त्यांचे बळजबरीने त्यांच्यासोबत आणलेल्या इनोवा क्रिस्टा या गाडीत घालून घेऊन गेले अशा तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर सदर गुन्ह्याचे घटनास्थळी लागलीच पथकासह भेट देऊन सदर गुन्ह्यातील येणार्या जाणार्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सदर सीसीटीव्ही मध्ये चार इसम इनोवा क्रिस्टा गाडीतून घेऊन जात असल्याचे सदर गाडीचा शोध घेण्याकरता आंम्ही पोनि साखरे यांचे मार्गदर्शनाखाली दोन टीम बनवून सदर इनोवा क्रिस्टा गाडीचा शोध घेण्याकरता घोटी टोल नाका तसेच शिंदे पळसे टोल नाका या ठिकाणी जाऊन सदर ईनोवा गाडीचा शोध घेण्याचा कसोशीने प्रयत्न केला.CDR Analysis केले तसेच पोलिस ठाणे हद्दीत तसेच आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस स्टेशनना माहिती दिली.
तपासादरम्यान सदर किडनॅप व्यक्ती, गुजरात राज्य अहमदाबाद येथील हाफ मर्डर केस मध्ये बारा वर्षापासून फरार होती व त्यासअहमदाबाद क्राईम ब्रँच पोलीस नाशिक या ठिकाणी आले व सदर इसमास अहमदाबाद पोलीस घेऊन गेले अशी माहिती मिळाली. सदर घटनेबाबत खात्री करण्याकरता गुजरातअहमदाबाद क्राइम ब्रांच पोलीस निरीक्षक देसाई यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता त्यांनी तो त्यांच्याकडील साबरमती पोस्टे गुरनं 426/2009 भादवी 307,120(ब)114 Arms act प्रमाणे दाखल गुन्ह्यात १२ वर्षे पासून फरार असल्याचे सांगून इसम नामे संजीव वैद्य याला त्यांचे पथकाने नाशिक येथून ताब्यात घेतले असल्याचे सांगितले आहे. तरी पंचवटी पोलिस ठाण्याचे पोनि अशोक साखरे ,सपोनि सत्यवान पवार, गुन्हे शोध पथक तसेच सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी रोहित केदार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर अतिसंवेदनशील गुन्ह्याचा गुन्हा घडल्यापासून तपास करून गुन्ह्यातील नेमका प्रकार उघडकिस आणला आहे.