महिला अत्याचार प्रकरणी एकास अटक
नाशिक – महिलेच्या घरात घुसून तीच्यावर अत्याचार करणार्या एकास पंचवटी पोलीसांनी अटक केली आहे. रातु सिताराम आहिरे (४१, रा. मायेको दवाखान्याजवळ फुलेनगर, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार अहिरे हा ९ एप्रिल रोजी मध्यरात्री पीडितेच्या घरात घुसला. झोपेत असलेल्या पीडितेवर त्याने जबरदस्तीने अत्याचार केले. तसेच कोणाला काही सांगीतल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास अटक करण्यात आली असून अधिक तपास उपनिरिक्षक पाटील करत आहेत.
……
विवाहितेच्या छळ प्रकरणी गुन्हा
नाशिक – माहेरून तीन लाख रूपये आणावेत तसेच चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळींनी छळ केल्या प्रकरणी पतीसह तीघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज नितीन गोसावी, भावना गोसावी, नितील गोसावी (रा. सर्व अकलोली, भिवंडी, जि. ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी सातपूर कॉलनी येथे राहणार्या पीडित विवाहितेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार माहेरून पैसे आणावेत या कारणासाठी तसेच चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळींनी शाररिक तसेच मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक आहेर करत आहेत.
……
युवकाची आत्महत्या
नाशिक – राहत्या घरी गळफास घेऊन २२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.१६) रात्री घडली. राहुल मधुकर गहिले (२२, रा. भिमवाडी झोपडपट्टी, गंजमाळ, नाशिक) असे आत्महत्या करणार्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे आजोबा रामचंद्र गहिले यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पहाटे एका खोलीत दोरीच्या सहाय्याने छतास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वाघ करत आहेत.
……….