शिलापूरच्या रिसर्च इन्स्टीट्यूटमध्य मोठी चोरी; दीड लाख रूपयाची कॉपर वायर चोरीला
नाशिक : शिलापूर येथील रिसर्च इन्स्टीट्यूटमधील इलेक्ट्रीक ट्रान्सफार्मरमधून चोरट्यांनी सुमारे दीड लाख रूपये किंमतीची कॉपर वायर चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद इस्त्राईल इजहार सिध्दीकी (मुळ रा.दिल्ली हल्ली शिलापूर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मोहम्मद सिध्दीकी शिलापूर येथील केंद्रीय लोक निर्माण विभागाच्या प्रोजेक्ट कंट्रोल पावर इन्स्टिट्यूट व रिजनल टेस्टींग लॅब येथे कार्यरत असून मंगळवारी (दि.३१) रात्री ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी इन्स्ट्यिूट आवारात प्रवेश करून इलेक्ट्रीक ट्रान्सफार्मरचे टॉपकव्हरचे नटबोल्ड खोलून सुमारे दीड लाख रूपये किमतीची कॉपर वायर चोरून नेली. अधिक तपास हवालदार नरवडे करीत आहेत.
.
कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप केले लंपास
नाशिक : पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप व महत्वाची कागदपत्र चोरून नेली. ही घटना गंगापूररोड भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विपुल वर्धमान भंडारी (रा.सौभाग्यनगर,गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. भंडारी यांनी आपली कार एमएच १५ एमएच ३४३५ गेल्या मंगळवारी (दि.३१) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना अज्ञात चोरट्यांनी पाठीमागची काच फोडून शिटावर ठेवलेली बॅग चोरून नेली. बॅगेत लॅपटॉप व महत्वाची कागदपत्र असा सुमारे २० हजाराचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार कटारे करीत आहेत.
.
दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकावून नेल्याची घटना
नाशिक : मोबाईलवर बोलत रस्त्यात उभ्या असलेल्या महिलेच्या हातातून दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकावून नेल्याची घटना राजसारखी सोसायटी परिसरात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरती प्रशांत भामरे (रा.कलावतीनगर,इंदिरानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भामरे या बुधवारी (दि.१) राजसारथी सोसायटी भागात गेल्या होत्या. सोसायटीच्या पाठीमागील प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर त्या मोबाईलवर बोलत असतांना ही घटना घडली. भरधाव आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.
चोरट्यांनी मुंबईच्या महिलेची बॅग केली लंपास
नाशिक : टॅक्सी स्टॅण्डवर प्रवासी वाहनाची प्रतिक्षा करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी मुंबईच्या महिलेची बॅग चोरून नेल्याची घटना गंगापूररोडवरील मल्हारखान झोपडपट्टी समोर भागात घडली. बँगेत सोन्याचे दागिणे, मोबाईल आणि महत्वाचे कागदपत्र होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पल्लवी धीरज घोलप (रा.घाटकोपर,मुंबई) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. घोलप बुधवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास मुंबईहून शहरात दाखल झाल्या होत्या. गिरणारे येथे जाण्यासाठी त्या मल्हारखान झोपडपट्टीसमोरील टॅक्सी स्टॅण्डवर बॅग जमिनीवर ठेवून प्रवासी वाहनाची प्रतिक्षा करीत असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्याने त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधत बॅग चोरून नेली. या बॅगेत सोन्याची पोत,मोबाईल आणि एटीएम कार्ड असा सुमारे ४१ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार गावीत करीत आहेत.