औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतून चोरी; सोलट वॉटर टँकच्या प्लेटा, ट्यूब ग्लास चोरट्यांनी केल्या लंपास
नाशिक : औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या आवारातून सोलट वॉटर टँकच्या ३५ प्लेटा आणि ९ ट्यूब ग्लास चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना आयटीआय सिग्नल भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिगंबर रामभाऊ डोंगरे (रा.हनुमाननगर,पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे. औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या मालकिच्या सुमारे ४० हजार रूपये किमतीच्या प्लेटा आणि ट्यूब ग्लास चोरट्यांनी चोरट्यांनी चोरून नेल्या ही घटना .९ ऑगष्ट रोजी घडली. अधिक तपास जमादार सय्यद करीत आहेत.
गळय़ातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबडली
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या दोन महिलांपैकी वृध्द महिलेच्या गळय़ातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबडून नेल्याची घटना वडाळा पाथर्डी मार्गावर घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमिला सुदामराव सोमवंशी (६९ रा.कलाकृष्ण अपा.इंदिरानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोमवंशी या मंगळवारी (दि.३१) रात्री जेवण आटोपून शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. बहिण लतीका यांना सोबत घेवून त्या फेरफटका मारून घराकडे परतत असतांना चर्चजवळील श्रीजी कृपा अपार्टमेंट भागात समोरून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळयातील सुमारे ७० हजार रूपये किमतीची दुपदरी पोत हिसकावून राणेनगरच्या दिशेने पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.