कारची काच फोडून चोरट्यांनी म्युझिक सिस्टीम व महागडा चष्मा केला लंपास
नाशिक : पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी म्युझिक सिस्टीम आणि महागडा चष्मा चोरून नेला. ही घटना कॉलेजरोड भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शितल भंडारे (रा.जयशाम अपा.पाटील लेन नं.४) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भंडारे यांची कार एमएच १५ एफटी १३१६ मंगळवारी (दि.३१) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारची डाव्या बाजूची काच फोडून म्युझिक सिस्टीम आणि रेबन कंपनीचा चष्मा असा सुमारे २० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार खुळात करीत आहेत.
…
तडीपार गुंडास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक : गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणा-या तडीपार गुंडास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीत जियाउद्दीन डेपो या बारदान गोडावून भागात मिळून आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिध्दांत सचिन धनेश्वर (२० रा.चव्हाण मळा,जयभवानीरोड) असे अटक केलेल्या तडिपार संशयीताचे नाव आहे. धनेश्वर याच्या गुन्हेगारी कारवाया वाढल्याने शहर पोलीसांनी त्यास दोन वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांना संशयीत मंगळवारी (दि.३१) रात्री जियाउद्दीन डेपो भागात आल्याची माहिती मिळाल्याने नाशिकरोड पोलीसांनी सापळा लावून त्यास बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलीस शिपाई समाधान वाजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक जुंद्रे करीत आहेत.