नाशिक – अंबड पोलीस ठाणे हद्दीतील दत्तनगरमध्ये पूर्व वैमनस्यातून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता घडली होती. या प्रकरणात आता चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून सराईत गुन्हेगारासह तिघांनी धारदार शस्त्राने केल्याचे बोलले जात होते. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव राहुल गवळी (वय २५, रा. नाशिक) असे आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जण पोलिसांनी अवघ्या काही तासात हाती लागले आहे. या खूनानंतर या भागात भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये निर्माण झाले आहे.