वेगवेगळया भागात दोन घरफोड्या; पाच लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
नाशिक : शहरात घरफोडीची मालिका सुरू असून वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी पाच लाख रुपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात एक भरदिवसा झालेल्या घरफोडीचा समावेश असून या घरफोडींमध्ये चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी म्हसरूळ आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रघुनाथ मावजी ठाकरे (रा.हरीषमुर्ती रो हाऊस,श्रीरामनगर,बोरगड) यांनी दिलेल्या तक्रारी म्हटले आहे. दि.२३ ते ३० ऑगष्ट दरम्यान ठाकरे कुटूंबिय बदलापूर (ठाणे) येथे गेले होते. या काळात चोरट्यांनी त्यांच्या रो हाऊसचे सेफ्टी दरवाजाचे लॅच लॉक तोडून घरातील टीव्ही आणि कपाटातील सोन्याचे लॉकीट असा सुमारे २५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार वाघ करीत आहेत. दुसरी घटना गंजमाळ भागात घडली. फराह तन्वीर तिरणदाज (रा.आंबेडकर पुतळय़ा जवळ,पंचशीलनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तिरणदाज कुटूंबिय सोमवारी (दि.३०) कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. भरदिवसा चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ४ लाख १० हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४ लाख ७० हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
महिलेच्या गळयातील मंगळसुत्र दुचाकीस्वारांनी लांबविले
नाशिक : पती समवेत शतपावली करून घराकडे परतणा-या महिलेच्या गळयातील मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना दिंडोरीरोड भागात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारामती पंडीत गवळी (५९ रा. एस्सार पेट्रोल पंपामागे,दिंडोरीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गवळी दांम्पत्य मंगळवारी (दि.३१) शतपावलीसाठी घराबाहेर पडले होते. किशोर सुर्यवंशी मार्ग ते बोरगड या लिंकरोडने गवळी दांम्पत्य शतपावली करून आपल्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. रस्त्याने पायी जात असतांना गजानन दर्शन अपार्टर्मेंट समोरून दांम्पत्य जात असतांना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी पुन्हा माघारी फिरून येत तारामती गवळी यांच्या गळय़ातील सुमारे ३५ हजार रुपए किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
…