नाशिक – अंबड पोलीस ठाणे हद्दीतील दत्तनगरमध्ये पूर्व वैमनस्यातून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा खून सराईत गुन्हेगारासह तिघांनी धारदार शस्त्राने केला आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव राहुल गवळी (वय २५, रा. नाशिक) असे आहे. रात्री ९.३० वाजता ही घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खूनानंतर या भागात भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये निर्माण झाले आहे. खुनाच्या घटनेनंतर सराईत गुन्हेगार फरार झाले आहे.