नाशिक – केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप कार्यालयाची तोडफोड करणारे शिवसेना नगरसेवक, नगरसेवीकेचा पती आणि अन्य तिघा शिवसैनिकांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यानंतर त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये नगरसेवक दीपक दातीर (३१, रा. नवनाथनगर, दातीर मळा, अंबड), नितीन सामोरे (३५, स्वामी नगर, अंबड), योगेश चुंबळे (३४, रा. गौळाणे, ता. नाशिक), नगरसेविकेचे पती योगेश उर्फ बाळा दराडे (३३, रा. अश्विननगर, सिडको) आणि किशोर साळवे (२४, रा. नवनाथ नगर, अंबड) अशी पाच संशयितांची नावे आहेत.
या तोडफोड करणा-या नगरसेवकाला अटक करावी म्हणून भाजपने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन अटकेची मागणी केली होती. खा. संजय राऊत बरोबर हे फरार आरोपी असल्याचाही आरोप केला होता. पण, शनिवारी या तोडफोडीच्या आरोपींना करण्यात आली. त्यानंतर त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. काल याबाबतची नाशिक दौ-यावर असलेले शिवसेनेचे नेते व खा. संजय राऊत यांनी मी देखील खासदार आहे मला कायद्याचा अभ्यास आहे. मी कायदा तोडत नाही. नगरसेवक दीपक दातीर आणि नगरसेविका किरण दराडे यांचे पती बाळा दराडे यांना मी आश्रय दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना मी लगेच पोलिसांसमोर हजर राहायला लावले असेही म्हणाले होते.