फोन पेच्या ग्राहक केंद्रातून बोलत असल्याचे सांगून सव्वा लाखाला ऑनलाईन गंडा
नाशिक – नाशिक रोडला ज्येष्ठ नागरिकाला एकाने फोन पेच्या ग्राहक केंद्रातून बोलत असल्याचे सांगून सुमारे १ लाख १३ हजाराला गंडविले. याप्रकरणी बद्री विशाल शुक्ला (वय ६२, हरिओम नगर, आर्टीलरी सेंटर रोड) यांच्या तक्रारीवरुन अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी १२ जून ते १३ जून २०२१
दरम्यान बद्री शुक्ला यांना ९८८३९६७७१५ या मोबाईलवरुन फोन आला फोन पे कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून एसबीआय व पीएनबी या बॅकांच्या खात्यातून १ लाख १३ हजार ९५२ रुपये परस्पर काढून घेत फसविले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक एम.आर.कोळी तपास करीत आहेत.
देवळाली कॅम्पला एकावर चॉपरने वार
नाशिक – देवळाली कॅम्पला लेव्हीट मार्केट परिसरातील दुकानात काम करणाऱ्यावर एकाने चॉपरने वार केले. आकाश सुनील बुंदेले (रविवार बाजारपेठ दे.कॅम्प) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी यश रविंद्र पोटोळे (वय २२ अण्णा भाउ साठेनगर याच्या तक्रारीवरुन देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी सोमवारी (ता.२३) सायंकाळी पाचच्या सुमारास देवळाली कॅम्पला लेव्हीट मार्केट परिसरातील तारा ड्रेसेस दुकानासमोर संशयित आकाशा सुनील बुंदेले हा रविंद्र पाटोळे यांच्यासोबत यश याला तुझा भाउ ऋषीकेष कोठे आहे त्याला बोलव असे म्हणत कमरेला खोचलेल्या लोखंडी चॉपरने यशच्या डाव्या हाताच्या पंजावर मारुन जखमी केले तसेच यश व त्याच्या वडीलांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. पोलिस उपनिरीक्षक आर.एन.वाघ तपास करीत आहेत.