बस स्वच्छता करणाऱ्या डोक्यात फोडली बियरची बाटली; गुन्हा दाखल
नाशिक – निमाणी बसस्थानकात बस स्वच्छता करणाऱ्या एकाच्या डोक्यात बियर फोडून जखमी करण्यात आले. राहूल मच्छिंद्र पवार (वय २५) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी जगदीश अजय कटारे (वय ३०, गंगापूर) यांच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी बुधवारी (ता.२५)
दुपारी एकला जगदीश कटारे हे बस स्वच्छ करीत असतांना संशयित राहूल पवार याने त्यांच्या भावाशी झालेल्या भांडणाची कुरापत काढून बियरच्या बाटलीने डोके फोडून दुखापत केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल असून पोलिस नाईक डी.पी.गावीत तपास करीत आहेत.
जेल रोडला विनयभंगावरुन एकाला अटक
नाशिक – जेल रोडला शिवगंगा अपार्टमेंटमध्ये परिसरात अल्पवीयन मुलीच्या विनयभंगावरुन एकाला अटक करण्यात आली. सनी प्रमोद उघाडे (वय ३६, शिवगंगा अपार्टमेंट ) असे संशियताचे नाव आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी (ता.२४) दुपारी अडीचच्या सुमारास संशयिताने पीडितेच्या मुलीला कुरकुरे आणण्याच्या बहण्याने घरात बोलावून घेत दरवाजा बंद करुन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक न्याहदे तपास करीत आहे.
जेल रोडला अज्ञातांनी इंडिका पेटविली
नाशिक – जेल रोडला स्वागत हौसीग सोसायटी परिसरात इंडिका कार पेटविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोनी सुजित पवार (वय ३३, स्वागत हौसींग सोसायटी) यांच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी मंगळवारी (ता.२४) रात्री दहाच्या सुमारास साईनाथनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर फिर्यादीच्या भाऊ सनी उघाडे यांची टाटा कंपनीची इंडिका व्हिस्टा (एमएच १५ डीसी ८५२१) अज्ञात संशयितांनी काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून कार पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.