नाशिक – क्लास सुटल्यानंतर घरी चाललेल्या युवतीला रस्त्यात अडवून विनयभंग
नाशिक – क्लास सुटल्यानंतर घरी चाललेल्या युवतीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करणाऱ्या एकाला पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यश गणेश सपकाळ (वय २०, स्वामी विवेकानंद चौक) असे संशयित युवकाचे नाव आहे. पीडित युवतीच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी पीडित युवती तिच्या बहिणीसोबत बुधवारी (ता.२५) सायंकाळी सहाला क्लास सुटल्यानंतर प्लेझर दुचाकीवरुन घरी जात असतांना अमरधाम रोडवरील स्वामी विवेकानंद चौकात संशयिताने दुचाकी अडवून मला तुझ्याशी बोलायचे आहे. असे म्हणत तिचा उजवा हात धरत अंगावर ओढत वाईट साईट शिवीगाळ करीत मी तुला नंतर बघून घेतो असे म्हणत दमदाटी केली.
ट्रान्सफार्मरसह आरमाड केबलची चोरी
नाशिक – आडगाव शिवारात वीजेच्या ट्रान्सफार्मरसह आरमाड केबल चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मनीष दिलीप पगारे (वय ३४, श्रीनाथजी हाईटस सरस्वतीनगर पंचवटी) यांच्या तक्रारीवरुन आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई आग्रा महामार्गालगत आडगाव शिवारात मंगळवारी (ता.२४) रात्रीतून कधीतरी भरकादेवी आईस्क्रीम गोडाउन समोरुन एम्को कंपनीचा १०० केव्हीचा वीजेचा ट्रान्सफार्मर (क्रमांक ५३७००९३) आणि १० हजाराची पॉलीकॅब कंपनीची आरमाड केबल चोरट्यांनी चोरुन नेली.