रस्त्यावरील गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्याने महिलेच्या पर्समधील २५ हजाराचे दागिणे केले लंपास
नाशिक – हुंडीवाला लेन परिसरातील रस्त्यावरील गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्याने महिलेच्या पर्समधील दागिणे लंपास केले. देवयानी कैलास सोनार (वय ४२, जटायु चौक, सिंहस्थनगर) या शनिवारी (ता.२१) दुपारी अडीचच्या सुमारास हुंडीवाला लेन परिसरातील रुपमिलन दुकाना समोरुन जात असतांना गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्याने त्यांच्या खांद्यावर अडकविलेल्या बॅगेतील पर्समधील दागिणे चोरले. पर्समध्ये साडे चार ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या वाट्या सोन्याची मुरली असा सुमारे वीस ते पंचवीस हजाराचा ऐवज होता. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेहेडी नाक्यावर दुचाकी गायब
नाशिक – नाशिक पुणे महामार्गावरील चेहेडी नाका परिसरात चोरट्याने दुचाकी लंपास केली. याप्रकरणी महेश समुज यादव (वय ४३, स्वराज्यनगर, सामनगाव रोड ) यांच्या तक्रारीवरुन नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी महेश यादव मंगळवारी (ता.१७) सकाळी नऊला त्यांची दुचाकी स्प्लेंडर (एमएच १५ एफडी ७४५७) सकाळी नउला चेहेडी नाका परिसातील श्री लक्ष्मी मोटार गॅरेजसमोर उभी केली होती. चोरट्याने त्यांची दुचाकी चोरुन नेली.
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
नाशिक – नाशिक रोडला राहत्या घरी गळफास घेउन युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. दीपक सिताप्पा घुगरे (वय २३) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. काल रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास त्याने आर्टीलरी सेंटर सेंटर रोडवरील सुवर्ण सोसायटीत राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. त्याचे वडील सिताप्पा घुगरे व मामा बडू माणिक यांनी त्याला त्वरीत उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले मात्र सकाळी साडे दहाला डॉ. आंबोरे यांनी मृत घोषीत केले.
रेल्वेच्या धडकेत एक जण ठार
नाशिक – रेल्वेच्या धडकेत ओढा परिसरात एक जण ठार झाला. मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. रविवारी (ता.२२) साडे अकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. ओढा रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर अरुणकुमार सिन्हा यांच्या तक्रारीवरुन आडगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, मध्य रेल्वेच्या मार्गावरील किलोमीटर क्रमांक १९५ येथे १० ते १२ दरम्यान अप मार्गावर रेल्वेखाली चिरडून एकजण ठार झाल्याचे लक्षात आले.