घरफोडीच्या संशयावरुन पंचवटी व देवळाली कॅम्प परिसरात पोलिसांनी दोन जण घेतले ताब्यात
नाशिक – शहरात घरफोडीच्या घटना वाढत असतांना पोलीसही दक्ष झाले आहे. त्यामुळे रात्री गस्त घालतांना संशयावरुन पोलीसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन जण ताब्यात घेतले असून त्यांना अटक केली आहे. पहिल्या घटनेत पंचवटी परिसरात एक जण ताब्यात घेतला. तर दुस-या घटनेत देवळाली कॅम्प परिसरात एकचा समावेश आहे. पहिल्या घटनेत पंचवटी परिसरातील तारावालानगर परिसरात घरफोडीच्या संशयावरुन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. गौरव कैलास गदावी (वय २१, कमलनगर हिरावाडी) असे संशयिताचे नाव आहे. आज रविवारी (ता.२३) पहाटे एकच्या सुमारास तारवालानगर परिसरातील महाराणा हॉटेल जवळ वाईन शॉपच्या शटर जवळ घरफोडीच्या तयारीत पोलिसांना आढळून आला. पंचवटी पोलिसांचे पथक गस्त घालत असतांना मध्यरात्री एकच्या सुमारास संशयित वाईन शॉपच्या शटरजवळ घरफोडीच्या तयारी अंधारात लपून बसलेला आढळला. याप्रकरणी पोलिस शिपाई अविनाश शेटे यांच्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दुस-या घटनेत देवळाली कॅम्पला गुरुद्वारा परिसरात घरफोडीच्या संशयावरुन जेल रोड येथील एकाला पकडण्यात आले. अनिल विठ्ठल गुंजाळ (वय २०, आम्रपाली झोपडपट्टी, कॅनाल रोड जेल रोड) असे संशयिताचे नाव आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील मनोहर साहेबराव साळुंके हे देवळाली कॅम्प परिसरात गसत घालत असतांना काल रविवारी (ता.२३) पहाटे साडे चारच्या सुमारास संशयित अनिल हा गुरुद्वाराच्या परिसरात घरफोडीच्या तयारीत अंधारात लपलेला आढळून आला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉलेज रोडला हद्दपार सराईत जेरबंद
नाशिक – कॉलेज रोडला संत कबीर नगर परिसरात काल रविवारी (ता.२२) सायंकाळी साडे सातला हद्दपार सराईताला जेरबंद करण्यात आले. राहूल उर्फ गांग्या पोपट शिंदे (वय ३५, संत कबीरनगर, शिंदे चाळ)असे हद्दपार असलेल्या सराईताचे नाव आहे. शहर पोलिसंनी त्याला एक वर्षासाठी शहर-जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. असे असतांनाही काल रविवारी सायंकाळी तो शहर पोलिसांच्या हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करीत संत कबीर नगर परिसरात आढळून आला. याप्रकरणी पोलिस अंमलदार दीपक विठ्ठल जगताप (वय ३३, गंगापूर) यांच्या तक्रारीवरुन गंगापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.