स्टेट बॅकेतून बोलत असल्याचे सांगून केवासी मॅच होत नसल्याचे कारण देत ६५ हजराला गंडविले
नाशिक – स्टेट बॅकेतून बोलत असल्याचे सांगून केवासी मॅच होत नसल्याचे कारण देत नाशिक रोडला ऐंशी वर्षाच्या ज्येष्ठाला भामट्यांनी ६५ हजार रुपये परस्पर काढून घेत गंडविले. याप्रकरणी चंद्रशेखर मल्लप्पा ईरमाणी (वय ५९, धानेश्वरी बंगला, घाडगेनगर नाशिक रोड) यांच्या तक्रारीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक रोडला घाडगेनगर येथील मलीनाथ उल्लेप्पा हत्ती (वय ८३) यांना ८००२५२०१९८ या मोबाईलवरुन फोन आला. मी स्टेट बॅकेतून बोलत असून तुमचा केवायसी मॅच होत नसल्याचे सांगून त्यांच्याकडून बॅकेच्या कागदपत्रांची माहीती घेतली तसेच ओटीपी क्रमांक मागवून घेत, भामट्याने त्यांच्या चिंचवड येथील स्टेट बॅकेच्या खात्यातून ६५ हजार रुपये आॅनलाईन लंपास केले. वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे तपास करीत आहेत.
हिरावाडीत महिलेचे मंगळसूत्र ओरबडले
नाशिक – पंचवटीत हिरावाडी परिसरातील कॅनॉल रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी महिलेचे मंगळसूत्र ओरबडून नेले. बेबी भिवसिंग राठोड (वय ५३, कुंजबन सोसायटी-शक्तीनगर) असे पीडित महिलेचे नाव आहे. त्या शनिवारी (ता.२१) दुपारी पावने दोनच्या सुमारास हिरावाडी भागातील पाटाच्या रस्त्यावर जात असतांना पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोघा भामट्यांपैकी पाठीमागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील दोन ताळे सोन्याचे मंगळसूत्र ओरबडून नेले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.