रेल्वेस्थानक परिसरात दोघांवर कटरने वार
नाशिक – नाशिक रोडला रेल्वेस्थानक परिसरात सिगारेटचा धूर तोंडावर सोडल्याचा जाब विचारला म्हणून तिघांनी तिघांना दोघांना शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यात, एकावर कटरने वार करण्यात आले. याप्रकरणी शुभम सलेकचंद टाक (वय १७, धनगर गल्ली दे.गाव) यांच्या तक्रारीवरुन ऋषीकेश व त्याचे दोन साथीदार पूर्ण नाव नाहीत यांच्या विरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता.२०) रात्री दहाच्या सुमारास संशयित ऋषीकेश व त्याचे दोन साथीदार अंडाभुर्जीच्या गाड्याजवळ सिगारेट ओढत असतांना त्यांनी फिर्यादी शुभम टाक याच्या तोंडावर धूर सोडला धूर का सोडला याचा जाब विचारला असता, तिघा संशयितांनी तुम्ही या भागातील भाई आहे का, अशी कुरापत काढीत शुभम व त्याचा मित्र राम पेटारे या दोघांना शिवीगाळ करीत मारहाण केली तसेच ऋषीकेश याने कटरने वार करुन जखमी केले.
ड्राव्हरमधून मोबाईल चोरला
नाशिक – मुंबई नाका परिसरातील कालिका मंदीरालगतच्या हॉटेल रामा येथे हॉटेल्या सिक्युरिटी केबीनमधून चोरट्यांनी मोबाईल चोरुन नेला. याप्रकरणी निलेश वसंतराव जव्हारकर (वय ४५, शिवप्रकाश अपार्टमेंट विक्रीकर भवन जवळ) यांच्या तक्रारीवरुन मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी (ता.१४) दुपारी अडीचला चोरट्याने सुरक्षा रक्षकांच्या केबीनमधून त्यांचा सिव्हर गोल्डन रंगाचा ओपो कंपनीचा मोबाईल चोरुन नेला.
दुचाकी चोरली
नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या पार्किगंमधून दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी विरेंद्र हिरालाल मोघे (वय २१, हिरावाडी रोड पंचवटी) यांच्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विरेंद्र मोघे याने सहा जूनला जिल्हा रुग्णालयाच्या आवारात रेकॉर्ड रुमसमोरील वाहन पार्किंगमध्ये त्यांची लाल काळ्या रंगाची हिरो कॅप दुचाकी (एमएच १९ सीएन ५४६६) ही चोरट्यांनी चोरुन नेली.