नाशिक : कुटुंबिय घरात नसल्याची टेहळणी करून एकाच सोसायटीतील दोन घरे चोरट्यांनी फोडल्याचा घटना शिंगाडा तलाव परिसरात घडली. या घटनेत रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन जमनादास वाणी (रा.समेत शिखर सोसा.गुरूद्वारा रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. समेत शिखर सोसायटीतील सदस्य वाणी आणि त्यांचे शेजारी सुरेश शहा हे दोन्ही कुटुंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी हा डल्ला मारला. एकाच माळयावरील दोन्ही घरांचा चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून ही घरफोडी केली. ही घटना गुरूवारी (दि.१९) रात्री घडली. याघटनेत आठ हजाराच्या रोकडसह चांदीचे शिक्के व भांडे तसेच सोन्याची नथ असा सुमारे १८ हजार ८५० रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक शेख करीत आहेत.