टागोरनगरला दीड लाखाची घरफोडी
नाशिक : नाशिक पुणे मार्गावरील टागोरनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दीड लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोकडचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुकाराम धोंडीराम ठाकरे (रा.गार्डन व्ह्यू सोसा.) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ठाकरे कुटूंबिय रविवारी (दि.२) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे लॉक तोडून बेडरूममधील कपाटांमधून सोन्याचांदीचे दागिणे व रोकड असा सुमारे १ लाख ४५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार मुंन्तोडे करीत आहेत.
….
तरूणीवर बलात्कार एकास अटक
नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून २२ वर्षीय युवतीवर एकाने वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. सदर युवती गर्भवती राहिल्याने तसेच तरूणाने विवाह करण्यास नकार दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी संशयीतास अटक केली आहे.
चेतन रवी तंगे (रा.बेथलेनगर,शरणपूररोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. पंचवटीतील दत्तनगर भागात राहणाºया २२ वर्षीय तरूणीशी त्याचे प्रेमसंबध होते. मुलीस लग्नाचे आमिष दाखवित २३ सप्टेंबर २०१८ ते ३० एप्रिल २०२१ दरम्यान संशयीताने वारंवार युवतीस आपल्या घरी घेवून जात बलात्कार केला. तरूणी गर्भवती राहिल्याने तिने लग्नाचा तगादा लावला असता संशयीताने तिला नकार दिला. त्यामुळे भेदरलेल्या युवतीने पोलीसात धाव घेतली असून पोलीसांनी संशयीतास अटक केली आहे. अधिक तपास निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
…..