औरंगाबाद महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
नाशिक – औरंगाबाद महामार्गावर ओढा गावानजिक अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. चंद्रभान मुरलीधर जाधव (वय ५६, लाखलगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी तानाजी भाऊराव आहेर लाखलगाव (ता.नाशिक) यांच्या तकारीवरुन आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी (ता.१६) सायंकाळी साडे सातच्या सुमारास औरंगाबाद मार्गावरील ओढा गावातील दूध डेअरी समोर हा अपघात घडला. मृत चंद्रभान जाधव हे त्यांच्या स्कुटी (एमएच १५ एचएन १५९४) हिच्यावरुन लाखलगावला जात असतांना पाठीमागून आलेल्या अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या स्कुटीला कट मारली. त्यामुळे चंद्रभान जाधव यांच्या डोक्यावरुन चाक गेले तर त्यांच्या मागे बसलेले तानाजी आहेर हे दोघे दुचाकीवरुन पडून जखमी झाले. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात अपघात करुन दुचाकीस्वाराच्या मृत्युस कारणीभूत ठरुन पळून गेल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.
जातीवाचक शिवीगाळ केल्यावरुन महिलेवर गुन्हा
नाशिक – न्यायालयाच्या आवारातील मारुती चेंबर्सच्या तिसऱ्या मजल्यावर वकीलांच्या कक्षाजवळ महिलेने एकाला जातीवाचक
शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दिव्यानी मंगलचंद्र जैन असे संशयित महिलेचे नाव असून योगेश दशरथ घेगडमल
यांच्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार घेगडमल हे प्रसन्न सायखेडकर यांच्यासोबत उभे
असतांना महिलेने त्यांना जातीवरुन शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना तपास करीत आहे.